गेल्या अनेक दिवसांपासून “जून” चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची गाणी प्रदर्शित झाली. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. “प्लॅनेट मराठी”ओटीटी चे हेड आणि फाउंडर अक्षय बर्दापूरकर यांनी 30 जूनला हा चित्रपट या ओटीटीच्या प्लॅनेट मराठी सिनेमा या डिजिटल थेटरवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले.
नेहमी नजरेआड राहणारे बाप, मुलाचे नाते आणि आयुष्याच्या एका वळणावर अनपेक्षितपणे समोर येणारे मैत्री पलीकडचे नाते यांची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘जून’. औरंगाबाद मध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटाचे लेखन निखिल महाजन यांनी केले आहे सूर्योदय गोडबोले आणि वैभव ख्रिस्ती यांनी दिग्दर्शन केले.
सूहृदय गोडबोले आणि वैभव ख्रिस्ती यांनी दिग्दर्शन केले असून अभिनेत्री नेहा पेंडसे आणि अभिनेता सिद्धार्थ मेनन यांची धम्माल केमिस्ट्री चित्रपटात पाहता येईल. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट अनेक नामांकित फिल्मस फेस्टिवलमध्ये गाजला असून सिद्धार्थ मेनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला आहे. जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांच्या गीतांना संगीत दिले आहे.
प्लॅनेट मराठी आणि अ विस्टास मिडीया कॅपिटल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लॅनेट मराठी’ या जगातील पहिल्या वहिल्या मराठमोळ्या ओटीटीची सुरुवात होत आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी च्या डिजिटल थिएटरवर “जून” हा चित्रपट “हीलींग इस ब्यूटीफुल” अशी टॅगलाईन घेऊन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.