डिजिटल पेमेंट क्षेत्रातील कंपनी पेटीएमने एलपीजी सिलेंडर बुक करण्याची सोय केली आहे. ग्राहक आयव्हीआर मिस्ड कॉल किंवा व्हाट्सअप च्या माध्यमातून एलपीजी सिलेंडर बुक करून रक्कम भरू शकतात. पेटीएम ॲपच्या माध्यमातून सिलेंडर बुक केल्यास तीन सिलेंडर बुक केल्यानंतर ९०० रुपयांपर्यंत कॅश बॅक मिळण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. पण पेटीएम मार्फत पहिल्यांदा सिलेंडर बुक करणाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या सिलेंडर बुकिंगवर ग्राहकांना लाभ उठवता येणार आहे.