सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नोंदणीकृत घरेलू कामगारांचा बँकेचा तपशील उपलब्ध आहे. अशा कामगारांचा बँक खात्यात रुपये 1 हजार 500 इतके अर्थसहाय्य थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.
सन 2011 ते मार्च 2021 या कालावधीमध्ये नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना आवाहन करण्यात येते की, घरेलू कामगारांचे बँकेचा तपशील उपलब्ध नसल्यामुळे रक्कम रुपये 1 हजार 500 इतके अर्थसहाय्य देता येणे शक्य झाले नाही. या कालावधीमध्ये नांदणी केलेल्या घरेलू कामगारांनी त्यांचे बँकचा तपशील बँकेचे नाव,खाते क्रमांक,आयएफसी कोड, शाखेचे नाव मंडळाच्या http://public.mlwb.in/public या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यात यावे, नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास सरकारी कामगार अधिकारी या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02362-228872 या क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरुन नोंदणीकृत घरेलू कामगारांना रक्कम रुपये 1 हजार 500 चे अर्थसहाय्य शक्य होईल, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी,सिंधुदुर्ग कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.