You are currently viewing त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पालकमंत्र्यांकडून पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत

त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पालकमंत्र्यांकडून पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत

शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरींचा पाठपुरावा

तात्काळ बाब म्हणून नुकसानीचा प्रस्ताव सादर करण्याच्या तिलारीच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना

दोडामार्ग

आवाडे येथिल शेतकरी रमेश नाईक यांचे दोन रेडे शेतातून घरी येत असताना आचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीच्या पाण्यात वाहून गेले होते. सुदैवाने एक रेडा वाचला व एक रेडा मरण पावला होता. मृत्यु झालेल्या रेड्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी रमेश नाईक तसेच घोटगे व आवाडे येथिल शेतकऱ्यांचे तिलारी येथिल पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जखमी रेड्याला घेवून काल पासुन आंदोलन सुरु होते.पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सेना तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी गोपाळ गवस राजन मोर्ये यांनी पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ शेतकऱ्याला ५० हजाराची मदत करण्यात आली आहे. तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री. रोहित कोरे यांनी नुकसानीची जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केला जाईल तसेच त्याबाबत प्रस्ताव देखिल दिनांक २९/०६/ २०२१ मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल असे लेखी पत्र दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकरी अभियंता रोहित कोरे, जल संपदा विभागाचे आजगेकर , जल संपदा विभागाचे मुगदळ, तसेच शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी, शिवसेना जिल्हा उप संघंटक गोपाळ गवस, संतोष मोर्ये, घोटगे सरपंच संदिप नाईक, कानु दळवी, मंदार नाईक,गोकुलदास दळवी,स्वप्नील दळवी,सुहास दळवी,प्रदीप दळवी,नरेश काळबेकर तसेच इतर शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा