You are currently viewing कोविडसंदर्भात 2 लाख 54 हजार गुन्हे

कोविडसंदर्भात 2 लाख 54 हजार गुन्हे

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

25 कोटी 8 लाख रुपयांची दंड आकारणी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई :

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार दोन लाख 54 हजार गुन्हे दाखल तर 25 कोटी रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात 22 मार्च ते 14 सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार 2,54,929 गुन्हे नोंद झाले असून 34,742 व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्ह्यांसाठी  25 कोटी 08 लाख 71  हजार 314 रु. दंड आकारण्यात आला.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

यादरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 356 घटना घडल्या. त्यात 894 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबर- 1 लाख, 13 हजार 032  फोन

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  1,13,032 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,149 वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 182 पोलीस व 20 अधिकारी अशा एकूण 202 पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

नागरिकाचा सहभाग अपेक्षित

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा