उपसरपंच संघटनेचे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना निवेदन
ओरोस
कोरोना महामारी च्या काळात सरपंचा प्रमानेच उपसरपंच आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. तरी सरपंचा प्रमाणेच उपसरपंच यानाही विमा कवच व अन्य सुविधेचा लाभ मिळावा. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनच्या वतीने आज जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांना निवेदन सादर करून उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष आबा खवणेकर, सचिव हेमांगी तेली, उपाध्यक्ष मनस्वी परब ,यांच्यासह विठ्ठल निकम, अमित फ़ोडके, भारती आयरे, श्रीकांत घाटे, ज्ञानेश्वर तांडेल, संजय आयरे यांनी त्यांची भेट घेत लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्हा उपसरपंच संघटनेच्या वतीने आज जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली दीड वर्षे कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अशा या कोरोणा महामारीमध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. तर सध्या जिल्ह्यात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
या कोरोना काळात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच यांच्याप्रमाणेच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी काम करत आहेत. त्यामुळे सरपंच यांच्या प्रमाणेच उपसरपंच व सदस्य यानाही विमा कवच व शासनाच्या अन्य सुविधांचा लाभ मिळावा. कोरोना महामारी च्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील उपसरपंच व सदस्य जोमाने व एकजुटीने काम करत असतानाही जिल्हा परिषदेकडून स्वनिधीतून केवळ सरपंचांना विमा कवच व अन्य सुविधेचा लाभ दिला गेला आहे. उपसरपंच व सदस्य या लाभापासून वंचित आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व उपसरपंचाना विमा कवच लाभ मिळावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.