शेतकऱ्यांना हळद रोप तर आरोग्य कर्मचारी,आशा सेविका, महावितरण लाईनमन यांना रेनकोटचे वितरण
शिवसेना आंब्रडच्या वतीने आंब्रड, पोखरण, कुसबे या गावातील शेतकऱ्यांना हळद रोपांचे वाटप, तसेच आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, महावितरण लाईनमन यांना रेनकोटचे वाटप आज करण्यात आले. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आंब्रड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, तसेच कोविड काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांना पाठबळ देण्यासाठी शिवसैनिकांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे आ. वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी आंब्रड ग्रामपंचायत येथील कोविड लसीकरण केंद्राला भेट दिली. तसेच आंब्रड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. निगुडकर यांच्याकडून कोविड स्थितीचा आढावा घेतला. औषध पुरवठा व अन्य साहित्य याबाबत विचारणा केली. तसेच आवश्यक सूचना करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख विकास राऊळ, आंब्रड सरपंच विठ्ठल तेली, उपसरपंच श्री. परब, पोखरण सरपंच सौ. कदम, ग्रा. प. सदस्य अरुण सावंत, आबा मुंज, बबन परब, सागर वाळके, बाबल्या सावंत, ललित घाडी, राजू घाडी, संदीप परब, स्वप्नील मुंज, श्री. वंजारे, श्री. आंगणे, अनंत परब, सचिन दळवी , तसेच आंब्रड व पोखरण गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व शेतकरी उपस्थित होते.