आता आमदार पण येत्या निवडणूकीत असेच उडून जातील – कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी उडवली वैभव नाईक यांची खिल्ली
कुडाळमधील रस्ते असुदेत नाहीतर बांधकामे, त्याचा निकृष्ट दर्जा आमदार वैभव नाईक यांना कधीच का दिसत नाही, याचे उत्तर आता जनतेला समजून चुकले आहे. कुडाळ बस स्थानकाचे श्रेय जर आमदार वैभव नाईक घेत होते, तर मग त्या आज सत्यानाश झालेल्या बसस्टॅन्डबाबत ते आपले हात कसेकाय झटकू शकतात. आमदार वैभव नाईकांच्या तिथल्या बहुचर्चित घड्याळावरचे चक्क पत्रेच आज उडून गेलेत. थुकपट्टी लावलेली कामे जिथे उडून चालली आहेत, तिथले आमदार तरी कसे टिकणार? वजन वाढवण्यासाठी कितीही स्टंट केले, तरीही येत्या निवडणूकीत आमदार वैभव नाईक पण असेच उडून जातील, असा सणसणीत टोला भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी लगावला आहे.