You are currently viewing जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त देवगड पोलिसांकडून जनजागृती

जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त देवगड पोलिसांकडून जनजागृती

आजची युवा पिढी अनेकांच्या संगतीमुळे अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन आपले आयुष्य वाया घालवत आहेत. तेव्हा अशा घातक अंमली पदार्थ सेवनापासून युवा पिढी नागरीकांनी दूर राहावे, असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी जागतिक अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने जनजागृती प्रसंगी केले.

देवगड येथे जनजागृतीसाठी फलक देखील लावण्यात आले. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी यांच्या वतीने अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. अंमली पदार्थ सेवन केल्यास याचे दुष्परिणाम काय होतात? एकदा युवक यात अडकला तर त्याची कुटुंबातील व्यक्ती यांची काय बिकट अवस्था होते ? हे पटवून दिले. यावेळी वाहतूक पोलीस मिलिंद परब, अमित हळदणकर,फक्रुद्दीन आगा,आदी कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा