You are currently viewing प्रभाग रचनेवरून शिवसेना-भाजप आमने-सामने

प्रभाग रचनेवरून शिवसेना-भाजप आमने-सामने

 

मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे सीमांकन लोकसंख्येनुसार केले जाते. अद्याप पर्यंत जनगणना पूर्ण न झाल्यामुळे प्रभागातील लोकसंख्येचा अंदाज येणे शक्य नाही. त्यामुळे केवळ राजकीय दबावापोटी प्रभाग फेररचना करू नका.‌‌ असे पत्र भाजपने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिले आहे. प्रभागाच्या पुनर्रचनेवरून सध्या शिवसेना-भाजपमध्ये जोरदार मतभेद आहेत. २०११ च्या जनगणने याचा आधार घेत २९१७ मध्ये प्रभागांचे सीमांकन करण्यात आले होते. २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना महामारीमुळे जनगणनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कोणत्या प्रभागात किती लोकसंख्या वाढली किंवा कमी झाली हे सांगता येणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा