वेंगुर्ला :
उद्या दि. 25 जून 2021 रोजी दुपारी 12 वा. वेंगुर्ला येथे उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या नुतन रुग्णालयीन इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला येथे नवीन इमारत उभारून तिथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येत आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर हे ऑनलाईन उपस्थित असणार आहेत. तर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.

