दिल्ली :
संसदेच्य दोनही सभागृहांच्या कामकाजाचा आज दुसरा दिवस होता, याच संसदेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन म्हणाल्या, सध्या बॉलिवूडची बदनामी करण्याचा कट रचला जात आहे. बॉलिवूडची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर जया बच्चन यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे.
अवघ्या काही लोकांसाठी साऱ्या बॉलिवूड जगतालाच बदनाम करणं योग्य नसेल असंही त्या म्हणाल्या. ड्रग्ज मुद्द्यावरुन वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत काहीजण खाल्लेल्या थाळीतच छेद करतात वक्तव्य केलं आहे.
एंटरटेनमेंट इंडस्ट्रा दररोज ५ लाख लोकांना सरळ रोजगार देते.
देशाची आर्थिक स्थिती ठीक नाही आणि ह्या गोष्टींवरून ध्यान विचलित करण्यासाठी आमचा वापर केला जात आहे असा जया बच्चन म्हणाल्या. आम्हाला सरकारकडूनही समर्थन मिळत नाही आहे. ज्या लोकांनी सिने इंडस्ट्रीच्या मदतीने नाव कमावले ते याला गटार म्हणत आहे. मी याचे समर्थन करत नाही असा त्यांनी आज अधिवेशनात म्हटल.