वृत्तसेवा :
कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे.नागपूर बाजार समिती वर ठिय्या आंदोलन करतायत तर दुसरी कडे मुंबई आग्रा महामार्गावर वर रस्ता रोखून ठेवला आहे.
तर अनेक ठिकाणी लिलाव बंदी केली जात आहे.
नाशिक मधे ठीक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कांदा निर्यात बंद करण्याचा आदेश भारत सरकारने दिला. देशातील कांद्याची उपलब्धता वाढावी या हेतूने निर्यात बंदी लागू करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला. आघोषित निर्णय घेतल्या मुळे आत्ता कांदा कोंडी अनेक ठिकाणी करण्यात आली आहे
त्या मुळे कांदा निर्यात बाबत शेतकरी आक्रमक झाला आहे.
केंद्राच्या या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे.
दरम्यान कांदा कोंडी सोडण्या साठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.