कुडाळ :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने सध्या हैदोस घातलेला आहे. राज्य सरकारचे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लक्ष नाही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ११ जून पासून जिल्ह्यात “लक्षवेध” आंदोलन राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कुडाळ भाजपच्या वतीने कोविड सेंटर,ग्रामीण रुग्णालय ह्या ठिकाणी भाजपने आज कुडाळात लक्षवेधी आंदोलन केले. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व मृत्यू दर पाहता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा डळमळीत होऊन कोरोना महामारी फोफावत चाललेली आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड, तज्ञ डॉक्टर, औषध पुरवठा तसेच अपुरे आरोग्य कर्मचारी, त्यांचा विलंबाने होत असलेला पगार, कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध न होणे, वैद्यकीय उपकरणांचा तुडवडा ही इथली प्रमुख अडचण आहे. यावर राज्य शासनाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येते म्हणून जिल्ह्यात मृत्यूदर प्रमाण वाढले आहे.
तरी तात्काळ आरोग्य यंत्रणा सुधारणे गरजेचे आहे, याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी व उपायोजना करावी ही विनंती भाजपने आपल्या निवेदनाद्वारे कुडाळ तहसीलदार यांच्याकडे केली तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार परिसरातील कोविड सेंटर हॉस्पिटल समोर लक्षवेध आंदोलना बाबत पालकमंत्री ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करत कुडाळ पोलिस ठाण्यात हजर केले. या आंदोलनात कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नुतून आईर, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, ज्येष्ठ नेते राजू राऊळ, मोहन सावंत, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे, ओरोस महिला मंडल अध्यक्षा सौ सुप्रिया वालावकर, महिला शहर अध्यक्ष ममता धुरी, सोशल मीडिया जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष राजवीर पाटील, तालुका उपाध्यक्ष राजा धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर, देवेन्द्र सामंत, चारुदत्त देसाई, युवा तालुका उपाध्यक्ष चंदन कांबळी, रेवती राणे, राकेश नेमळेकर, निलेश परब, बाळा कुडाळकर, विश्वास पांगुळ,आदी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.