You are currently viewing आ. वैभव नाईक यांना आव्हानाची भाषा शोभत नाही: चेतन मुसळे

आ. वैभव नाईक यांना आव्हानाची भाषा शोभत नाही: चेतन मुसळे

मालवण :

सात वर्षांपूर्वी झालेला आमने सामने  राडा शिवसैनिकांनीच केला. या घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे  वैभव नाईक यांनी  राणेंची पोलखोल  करण्यासाठी तत्कालीन राणे समर्थक सतीश  सावंत यांना आमने सामनेचे आव्हान दीले होते. आज ते शिवसेनेत आहेत  जी पोलखोल तेव्हा करायची होती ती आता पण आपण करू शकता तसे पुरावे आपल्याजवळ आहेत असे त्यावेळी पत्रकारांना वैभव नाईक यांनी सांगितले, मग आता तर सतिश सावंत आज आपल्याच पक्षात आहेत का नाही विचारलात? असा सवाल सुकळवाड विभागीय अध्यक्ष चेतन मुसळे यांनी केला आहे.

आज सत्ता तुमची आहे आणि मुख्यमंत्री स्वतः उध्दव ठाकरे आहेत. ज्या मराठा हाॅल कणकवली येथे आमने सामने चे आव्हान दिले गेले त्यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सोबत मी एकमेव कार्यकर्ता म्हणून उपस्थित होतो. वैभव नाईक यांना माहीत होत पोलीस आपल्याला आतमध्ये सोडणार नाहीत,म्हणून मी जबरदस्तीने आत घुसणार मला अटक करा ही वाक्य नाईक यांची होती. पोलीसांनी नाईक यांना अटक करून एका तासात सोडले नंतर ते शिवसेना शाखेजवळ आले शाखेच्या बाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा होते. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. त्याठिकाणी विरोधक किंवा राणे समर्थक एकही नव्हता.

*राडा पूर्वनियोजित होता* त्याची पुर्ण जबाबदारी वैभव नाईक यांचा ड्रायव्हर अरून परब यांच्यावर होती. वैभव नाईक यांना पोलिसांनी सोडल्याचा आनंद आणि आपण जिंकलो हा भ्रम कार्यकर्त्याच्या मनात होता. दुरदैवाने मी सुध्दा शिवसेनेत होतो अरुण परब यांनी विजयाचा आनंद व्यक्त करताना फटाक्याची माळ लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित पोलीसांनी वातावरण चिघळू नये म्हणून फटाके लावण्यास विरोध करून फटाके फेकून दीले. तत्पूर्वी दुसरी माळ वाजवण्यात आली. त्यावेळी पोलीस धाऊन आले तेव्हा शिवसैनिक पोलीसांच्या अगावर जात दगड व खुर्च्या फेकल्या आणि राड्याला सुरूवात झाली. त्यावेळी सुध्दा वैभव नाईक  त्यावेळेचे पोलिस अधीक्षक श अभिषेक त्रिमुखे याच्या अंगावर गेले.  हा राडा शिवसैनिकांनीच घडवला आणि वैभव नाईक यांनी आपली पत्रकारांना  स्टेटमेंट्स दिली. राणेंवर आरोप करत राणेंनी पोलीसांवर दबाव आणुन शिवसैनिकांवर लाठीचार्ज केला असा आरोप केला. यापैकी कोणतीही गोष्ट घडलेली नाही.

*कालचा कुडाळचा राडा हा सुध्दा पूर्वनियोजित*

राडा करण्यासाठीच राणेंच्या पेट्रोल पंपावर आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचे  कारस्थान आमदार वैभव नाईक यांनी केले. शिवसैनिकांना दोन लिटर पेट्रोल आणि भाजपसाठी भाजप सदस्यत्वाचे ओळख पत्र दाखवुन फक्त एक लीटर पेट्रोल हा भेदभाव आमदारांनी का केला याचाच अर्थ हा राडा पूर्वनियोजित होता असा आरोप आमचा आहे.

पोलिसांच्या अंगावर धावून जाने आणि दहशत निर्माण करणे हे वैभव नाईक यांनी 2013 साली  कणकवली आमने सामने आंदोलनातुन चालु केले. आणि त्यामुळे आव्हान द्यायच आणि स्वतःच राडा करायचा हे सुसंस्कृत आमदार  वैभव नाईक यांना शोभत नाही. आव्हान स्वीकारायला निलेश राणे, नितेश राणे नको तर त्यांचे कार्यकर्तेच पुरेसे आहेत. असा आरोप भाजपा युवा मोर्चाला विभाग अध्यक्ष चेतन मुसळे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा