You are currently viewing कोरोना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५८ हजाराची मदत..

कोरोना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५८ हजाराची मदत..

विकास सावंत यांचा ५८ व्या वाढदिनी उपक्रम

प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे दिला धनादेश

सावंतवाडी
प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय कॉंग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विकास भाई सावंत यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोरोना या महाभयंकर आजाराशी लढा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी ५८ हजार रुपयांचा चेक विकासभाई यांच्या हस्ते सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या कडे सुपूर्द केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, सद्य स्थितीत देशभरात न दिसणाऱ्या विषाणू ने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही आजार अंगावर काढू नये. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. आपल्या वडिलांनी जिल्ह्यात त्यावेळी चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यांच्याच समाज कार्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा