चाराक्षरी काव्य
पावसाचे
धुमशान
थंडगार
वारा छान
रिमझिम
बरसतो
जोरदार
कोसळतो
नदी नाले
भरलेले
कुर्ल्या मासे
चढलेले
पाण्याखाली
रस्ते गेले
गाडीघोडे
अडलेले
शेतकरी
नांगरूण
घाली भूमी
पांघरूण
चिखलात
बाया पोरं
पेरणीची
घाई फार
ओले अंग
थरथरे
वाऱ्यासंगे
मस्ती करे
कुणग्यात
हिरवाई
काय दिसे
अपूर्वाई
(दिपी)✒️
दीपक पटेकर