रुसवा
तुझं माझ्यावर रुसणं,
कधी कधी खूप,
वेदना देऊन जातं.
जखम दिसली नाही तरी…
दुःख मात्र..
असह्य होतं.
कधी तुझा रुसवा,
मला खूप भावतो.
तर कधी,
तुझा रुसवा..
मनाला खोलवर दुखावतो.
टोचलेल्या काट्यागत…
तुझ्या चेहऱ्यावरचे,
एक हास्य…
तेव्हा मी,
दिवसरात्र शोधतो.
तिथेही तुझाच रुसवा…
त्या शोधाच्या आड येतो.
तुझा रुसवा जाता,
गाली गुलाब फुलतं.
मोगऱ्याचा फुलावाणी,
साजरं रूप खुलतं.
होऊनी प्रफुल्लित तन,
मन पाखरू उडतं..
मन पाखरू उडतं…
*(दीपी)*
दीपक पटेकर
८४४६७४३१९६