You are currently viewing कोरोना महामारी आणि योग, आयुर्वेदाचे महत्त्व

कोरोना महामारी आणि योग, आयुर्वेदाचे महत्त्व

या विषयावर प्रबोधनात्मक ऑनलाईन व्याख्यान.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन.

वैभववाडी.

दि.२१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ निमित्त ,कोरोना महामारी आणि योग आयुर्वेदाचे महत्त्व’ या विषयावर प्रबोधनात्मक ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जनजागृती आणि प्रबोधनाच्यादृष्टीने पहिले व्याख्यान कोरोना: वास्तव आणि अवास्तव या विषयावर आयोजित केले होते. दुसरे प्रबोधनात्मक ऑनलाईन व्याख्यान २१ जून रोजी आयोजित केले आहे. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. सोमवार दि.२१ जून २०२१ रोजी ७ व्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ च्या निमित्ताने “कोरोना महामारी आणि योग, आयुर्वेदाचे महत्त्व या विषयावर प्रबोधनात्मक दुसरे व्याख्यान संस्थेचे राज्य अध्यक्ष मा.डॉ.विजयजी लाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले आहे. मा.डॉ.तुळशीराम रावराणे, कणकवली(एम.डी.आयुर्वेद आणि योगतज्ञ) हे व्याख्यान देणार आहेत. सदर व्याख्यान सोमवार दि.२१ जून रोजी रात्री ठीक ८ ते ९ या वेळेमध्ये गूगल मिट ॲपवर होणार आहे. या कोरोना महामारीच्या काळात निरोगी आरोग्यासाठी सदर व्याख्यान आयोजित केले आहे. या महत्त्वाच्या व्याख्यानाचा लाभ
https://meet.google.com/jny-qwwc-bpw या लिंकवरून
घ्यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री. संदेश तुळसणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा