सुने सुने वर्ग,
सुनी सुनी शाळा.
अक्षरांविना एकला,
भिंतीवरचा फळा.
नाही घंटेचा आवाज,
ना प्रार्थना सकाळची.
नाही मुलांची गडबड,
ना घाई शाळेत येण्याची.
निशब्द झाल्या भिंती,
ना कुणी गिरबटले.
शांत झाले मैदान,
ओरड ना कुणी पडले.
शिक्षक येता शाळेत,
मन त्यांचे गहिवरते.
मुलांविना शाळा तरी,
त्यांना कुठे आवडते.
मुलं न येता शाळेत,
बाकं बोलू लागतात.
कोण येतील शिकण्या,
उत्तर याच मागतात.
मुलांशिवाय शाळा,
झाली आता पोरकी.
शाळेत जाण्याची वाट,
बघतात मुलं लाडकी.
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६