‘शिवसेना दैनंदिनी २०२१’ चे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी मुंबई येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार व माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना दैनंदिनि २०२१ चे निर्मिती प्रमुख जी. एस. परब, साकेत शरद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने १९९३ साली ‘शिवसेना दैनंदिनी’ ची प्रथम निर्मिती करण्यात आली. त्यानंतर सलग २९ वर्षे या दैनंदिनीची निर्मिती करण्यात येत आहे.
शिवसेना दैनंदिनी मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, उपनेते, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, महिला संघटक, उपविभाग संघटक, शाखा संघटक, शिवसेनेशी संलग्न विविध संघटना, इतर राज्यातील शिवसेना पदाधिकारी तसेच दैनंदिन जीवनातील उपयुक्त माहिती व त्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. जी.एस.परब, शरद पवार यांनी या दैनंदिनीची निर्मिती केली आहे.