You are currently viewing आंबोली चेकपोस्टवर कोरोना नाईट ड्युटी बजावताना शिक्षक जखमी

आंबोली चेकपोस्टवर कोरोना नाईट ड्युटी बजावताना शिक्षक जखमी

आंबोली
‌ रात्री आंबोली येथे नाईट ड्युटी करताना आंबोली जकात वाडी शाळेचे शिक्षक श्री अनिलकुमार चाळूचे सर यांच्या अंगावर पत्रा पडल्यामुळे जखमी झाले.काल रात्री आंबोली येथे जोरदार पाऊस, भयानक वारा त्यात चेक पोस्ट वर लाईट गेली होती, लाईट ची सोय इतर कोणतीच सोय नाही. श्री चाळूचे, श्री निर्मळ व श्री हसबे असे तीन जण प्रशासनाने सोय केलेल्या शेड मध्ये बसले असताना अचानक जोराचा पाऊस आणि वारा यामुळे तात्पुरती व्यवस्था असलेल्या शेड चे वरचे दोन पत्रे हलून श्री चाळूचे सर यांच्या अंगावर पडले. पोलीस आणि सोबतच्या शिक्षकानी त्यांना आंबोली दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले.
प्रशासनाला नाईट ड्युटी रद्द करण्याची वारंवार विनंती करूनही सातत्याने दुर्लक्ष केले गेले. ज्या ठिकाणी ड्युटी करायला लावत आहेत त्याठिकाणी रात्र काढण्यासाठी,वादळी वारा, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी कोणत्याच मूलभूत सुविधा नाहीत. अशा ठिकाणी ड्युटी लावून शिक्षकांना वेठीस धरलं जात असल्याची भावना शिक्षक वर्गाकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा