बांधकाम विभागाने सर्वेक्षण करण्याची गरज
न्हावेली
सावंतवाडी – मळेवाड रस्ता ते आरोस रस्त्याला जोडणारा गावातील मुख्य रस्ता नियोजनाअभावी बनवल्यामुळे निकृष्ट दर्जाचा बनल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत तर रस्त्यासाठी वापरण्यात आलेले पाण्याचे मोरी पाइप हे निकृष्ट वापल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत .
न्हावेलीच्या तीन किलोमीटर मुख्य रस्त्याचे काम याच वर्षी पूर्ण करण्यात आले हा रस्ता बनवताना ठेकेदाराने नियोजन पूर्व काम केले नाही या रस्त्याच रुंदीकरण करतेवेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूस खोदून त्यात मातीत खडी मिसळून त्याचा साइड बाजूने स्तर निमार्ण करून रुंदीकरण करण्यात आलं असा आरोप ग्रामस्थ करत आहेत
सद्या या रस्त्याची परिस्थिती अशी आहे की रस्त्याचा काहि भागाला साइडपट्टी नाही , काही ठिकाणी गटार लाईन ची खोदाई केली नाही , काही ठिकाणी नियोजित असलेल्या रुंदी पेक्षा कमी रुंदीचा रोड बनवण्यात आला तर काही ठिकाणी रस्ता बसून त्यात पाणी साचत आहे. तसेच या रस्त्यासाठी वापरण्यात आलेले मोरी पाईप साइड बाजूने तुटून त्यांचा लोखंडी सांगाडे दिसत आहेत.
या रस्त्याचे काम करतेवेळी नियोजन केले गेले नाही त्यात रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्य हे निकृष्ट दर्जाचे आहे रस्ताचे काम चालू असताना बांधकाम विभागाचा निरीक्षक तेथे उपस्थित असतो त्यांनी देखील नजर झाक केली अस दिसून येत आहे
या तीन किलोमीटर रस्त्याचं बांधकाम विभागाने पुन्हा सर्वेक्षण करावं व त्यात खरच तुर्ती आढळल्यास संबंधित ठेकेदाराकडून त्याच काम पुन्हा करून घ्यावं अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.