शिक्षक भारतीची शासनाकडे मागणी
तळेरे
कोविड 19 च्या आजाराच्या अनुषंगाने कणकवली तालुक्यातील माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या चेक पोस्ट कोविड सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण व विलगीकरण इ. ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेले अनेक दिवस कर्मचारी सुट्टी कालावधीत आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत.
दि.28 मे 2021 च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाने शैक्षणिक वर्ष 20-21 साठी दहावी बोर्ड परीक्षेची अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया सुरु झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे च्या दि.09 जून 2021 च्या परिपत्रकाने मूल्यमापन प्रक्रिया दि. 10 जून 2021 ते दि.30 जून 2021 या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
तसेच नवीन शैक्षणिक वर्ष 14 जून 2021 पासून सुरु होणार असून विदयार्थ्यांचे ऑन लाईन शिक्षण व इतर शालेय कामकाजासाठी माध्यमिक कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीतून कार्यमुक्त करावे त्याचबरोबर कोविड 19 च्या अनुषंगाने पुढील नेमणुकीतुन सूट देण्यात यावी अशी मागणी कणकवलीचे तहसिलदार आर.जे.पवार यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांना संघटनेच्यावतीने दिलेल्या लेखी पत्राद्वारे केली आहे.
जर तरीही बोर्डाच्या कामकाजात गुंतलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ड्युट्या लावण्यात आल्या तर शिक्षक भारती याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे.