You are currently viewing राज ठाकरे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून चंदनाच्या रोपांचे वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून चंदनाच्या रोपांचे वाटप

कुडाळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कुडाळ डेपोमध्ये ५३ चंदन झाडांची रोपे डेपो मॅनेजर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे हरी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ डेपोमध्ये चंदनाच्या झाडांची रोपे तसेच त्यांना लागणारे खत डेपो मॅनेजर यांच्याकडे सुपूर्द केले. सध्या कोविड काळात सर्वसामान्य जनतेला ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे होणाऱ्या नुकसानाचे गांभीर्य लक्षात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले. झाडे लावून निसर्गापासून दूर जाणाऱ्या लोकांनी कोकणचा कॅलिफोर्निया करावा, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेकडून कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास त्यांनी कळवावी असाही विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा