You are currently viewing कोलगांवातील पं. दिनदयाळ उपाध्याय विलगीकरण कक्षाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कोलगांवातील पं. दिनदयाळ उपाध्याय विलगीकरण कक्षाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी
कोलगांव ग्रामपंचायततर्फे तयार करण्यात आलेल्या पाटीदार समाज हॉल मधील पं. दिनदयाळ उपाध्याय विलगीकरण कक्षाचे उद्घाटन भाजपचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी, जि.प. महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गांवकर, सभापती निकिता सावंत, भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, पं. स. सदस्या प्राजक्ता केळुसकर, सरपंच संतोष राऊळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, नगरसेवक ॲड. परिमल नाईक, उपसरपंच दिनेश सारंग, माजी सरपंच संदीप हळदणकर, राजन कुडतरकर व अन्य भाजपा पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा