कणकवली :
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या पथकाने कणकवली तहसीलदारांसह फोंडा घाटाची पाहणी केली. अतिवृष्टी मुळे जर फोंडाघाटमध्ये घाटात दरड कोसळल्यास त्या अनुषंगाने एनडीआरएफ च्या टीम कडून पाहणी करण्यात आली. तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची देखील पाहणी करण्यात आली.
फोंडाघाट मध्ये घाटात एका ठिकाणी रस्त्याची संरक्षक भिंतीची पडझड झालेली. मात्र त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना तहसीलदार आर. जे. पवार पवार यांनी सा. बा. विभागाला दिल्या.
यावेळी एनडीआरएफचे निरीक्षक प्रमोद राय यांच्यासह त्यांच्या जवानांची टीम व कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, महसूल नायब तहसीलदार शिवाजी राठोड, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, तलाठी पंडित, ग्रामसेवक चेऊलकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.