You are currently viewing जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवाला जीवदान….

जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवाला जीवदान….

 

आज रविवारी सकाळी १०:३० च्या सुमारास वेंगुर्ल्यातील उभादांडा मुठवाडी येथील समुद्र किनारी काही स्थानिक मच्छीमार युवकांना किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीचे कासव जाळ्यात गुरफटलेले आढळून आले. त्यावेळी ललित गिरप, अनिल गिरप, निखिल तारी, साहिल तारी या स्थानिक मच्छीमार युवकांनी त्या कासवाची जाळ्यातून सुटका केरत त्यास जीवदान दिले. नंतर त्याला नैसर्गिक सागरी अधिवासात सोडण्यात आले.

उभादांडा समुद्रकिनारी या प्रकारची कासवे अंडी देण्यासाठी येत असतात. ऑलिव्ह रिडले कासवाच्या घरट्यातून बाहेर पडलेल्या कासव पिल्लांचे स्थानिक मच्छीमार संगोपन करत असतात, त्यांच्या अंड्यांचे योग्य त्या प्रकारे संरक्षण करून मग अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना त्यांच्या नैसर्गिक सागरी अधिवासात सोडले जाते. कधी कधी मासेमारीची जाळी ही त्यांच्यासाठी धोकादायक बनू शकतात अशा प्रकारे मोठी कासवे त्यात अडकून मृत्युमुखी पडतात. उभादांडा मुठवाडी येथील समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या अशाच या कासवाची जाळ्यातून सुटका केली. त्यास त्या युवकांनी जीवदान दिले. त्यांच्या या अभिनंदनीय कामगिरी बद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा