*सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमदार वैभव नाईक, संदेश पारकर व युवासेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजन*
सिंधुदूर्ग :
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ना. आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मंत्रिपद स्विकारल्यानंतर व त्या अगोदर सातत्याने राज्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून राज्याच्या हिताच्या दृष्टीने कार्य केले आहे. आमदार वैभव नाईक, युवानेते संदेश पारकर व युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये असणाऱ्या विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये साकारलेल्या कोविड केअर सेंटर मधील रुग्नांना यावेळी विविध अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यानंतर कणकवली शिरवल रस्त्यालगत वृक्षलागवड करून युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा नियोजन सदस्य संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, युवासेना समन्वयक राजू राठोड, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, युवासेना उप तालुकाप्रमुख प्रकाश वाघेरकर, भास्कर राणे, रुपेश आमडोस्कर,तुषार शिंदे, गणेश राणे, मारुती सावंत, प्राचार्य मंदार सावंत, गुरुनाथ मेस्त्री, आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.