– मनोरंजनासह इंटरनेट सुविधायुक्त पंधरा बेड : अमोल आरोसकर यांचा पुढाकार
बांदा
गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य शासनाने गृहविलगीकरण बंद करत संस्थात्मक विलगीकरणाचा आदेश दिल्यानंतर दांडेली ग्रामपंचायतच्यावतीने पंडित जवाहरलाल नेहरू विद्या मंदिरमध्ये 15 बेडचा संस्थात्मक विलगीकरण कक्ष सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोसकर यांच्या सहकार्याने उभारला आहे.
आशा स्वयंसेविका राजश्री मोरजकर व अंगणवाडी सेविका सुविधा मांजरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच कृष्णा पालयेकर, उपसरपंच सत्यनारायण माणगावकर, ग्रा.पं.सदस्य नीलेश आरोलकर, प्रफुल्लता मालवणकर, प्रतिक्षा खरात, रिचा शेटये, तलाठी सतीश गावडे, ग्रामसेवक वीणा धुरी, स्वयंसेवक संदीप माणगावकर, पोलिस पाटील अनंत मालवणकर, शिपाई मयुरी नाईक, डाटा ऑपरेटर सृष्टी गोडकर, आरोग्यसेवक शर्मिला लळीत, कमिटी सदस्य दीपा गोडकर, अमोल आरोसकर आदी उपस्थित होते. .
दांडेली ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचे शिल्पकार ठरलेले युवा कार्यकर्ते अमोल आरोसकर यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने गाव विलगीकरण कक्ष उभारण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सरपंच कृष्णा पालयेकर यांनी सांगितले.
अमोल आरोसकर म्हणाले की, दिलेला शब्द पूर्ण करून ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे काम करतो. माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून लवकरच दांडेली गावासाठी नवीन रुग्णवाहिका मिळणार आहे. माजी आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या विशेष सहकार्याने आम्ही ग्रामस्थांना चांगली आरोग्य सेवा देऊ, अशी प्रतिक्रिया ‘कार्यकर्ता म्हणून वावरणारा नेता’ अशी ओळख असलेल्या अमोल आरोसकर यांनी दिली.
दरम्यान, पंधरा बेड असलेल्या विलगीकरण कक्षासाठी वस्तूस्वरुपात किंवा आर्थिक स्वरुपात उत्तम मयेकर, बाबा फर्नांडिस, समीर मुळीक, रावजी पार्सेकर, संजू पांगम, अमोल आरोसकर, अनंत मालवणकर, गजानन दळवी यांनी मतदकार्य केले. सद्यस्थितीत दहा बेड असून पंधरा बेडचे नियोजन करण्यात आले असल्याचे स्वयंसेवक संदीप माणगावकर यांनी सांगितले.