You are currently viewing धक्कादायक ! श्रीमंत होण्यासाठी लहान मुले चोरीचा मार्ग अवलंबला

धक्कादायक ! श्रीमंत होण्यासाठी लहान मुले चोरीचा मार्ग अवलंबला

मुंबई :

आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यासोबत एक महिला  कल्याण स्थानक परिसरात  झोपली होती. तिचा डोळा लागल्याची संधी साधतच अज्ञात चोरट्यांनी चिमुकल्याचे अपहरण केलं. काही वेळानं बाळ जवळ नसल्याचे तिच्या लक्षात आले, तिने आजूबाजूला शोध घेतला, मात्र बाळ न दिसल्याने याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या ४८ तासात अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आणि बाळाला सुखरूप त्या माऊलीच्या स्वाधीन केलं.

कुणाल कोट,  हिना माजिद, विशाल त्र्यंबके, आरती कोट,  फरहान माजिद अशी आरोपींची नावे आहेत. विशाल याने कुणाल कोटच्या मदतीने या बाळाचं अपहरण केलं. या दोघांनी हे बाळ सांभाळण्यासाठी आरती हिला दिले होते, तिघे हे बाळ हिना माजिद, फरहान माजिद या दाम्पत्याला विकणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी मुले चोरीचा मार्ग निवडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा