सिंधुदुर्गनगरी
तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या जिल्हातील 5 हजार 918 कुटुंबांना मोफत केरोसीन वितरण करण्यात येणार असल्याचे, दादासाहेब गिते ,जिल्हा पुरवठा अधिकारी हे कळवितात.
सदर मोफत केरोसीन वितरणासाठी तालुका निहाय मंजूर नियतन पुढील प्रमाणे आहे. दोडामार्ग -584, सावंतवाडी-1744, वेंगुर्ला-1200, कुडाळ-3736, मालवण-10724, कणकवली-2144, देवगड-1004, वैभववाडी-2864 असे एकूण 12 हजार लिटर केरोसीन नियतन मंजूर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील तालुका निहाय बाधित कुटुंब पुढील प्रमाणे असून अंशत: व पुर्णत: बाधित कुटुंबांचा आकडा अनुक्रमे देण्यात आला आहे. सावंतवाडी- अंशत:- 431,पूर्णत:-5 दोडामार्ग अंशत:-146, पूर्णत:-0, वेंगुर्ला अंशत:-299, पूर्णत:-1, कुडाळ अंशत:-930, पूर्णत:-4, कणकवली अंशत:-536, पूर्णत:-0, मालवण अंशत:-2592, पूर्णत:-7, देवगड अंशत:251, पूर्णत:-0,वैभवाडी अंशत:-716, पूर्णत:-0 असे एकूण 5 हजार 918 तौक्ते वादळात कुटुंब बाधित झाले आहेत.