सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43 पूर्णांक 35 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 127.475 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 40(108), सावंतवाडी – 47(180), वेंगुर्ला – 15.8 (41.8), कुडाळ – 35(89), मालवण – 21(157), कणकवली – 105(149), देवगड – 47(144), वैभववाडी – 36(151), असा पाऊस झाला आहे.