You are currently viewing कोविड हॉटस्पॉट ठरलेल्या नेरूर गावाचा आमदार वैभव नाईक यांनी घेतला आढावा..

कोविड हॉटस्पॉट ठरलेल्या नेरूर गावाचा आमदार वैभव नाईक यांनी घेतला आढावा..

कुडाळ :

नेरूर गावात  कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने  कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज वालावल  प्राथमिक आरोग्य केंद्रात नेरूर गावाच्या कोविड  स्थितीचा आढावा घेतला.गावातील  नागरिकांची कोविड  टेस्ट करण्याची  सूचना त्यांनी केली. औषध पुरवठा आणि एकूण आरोग्य व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेत कोविड उपाययोजना बाबत आवश्यक सूचना केल्या. तसेच आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून प्रा.आ. केंद्रासाठी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला.

त्याचबरोबर नेरूर हायस्कुल येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामविलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी देखील आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन  ग्रामविलगीकरण कक्षात उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली व आवश्यक सूचना केल्या.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा शिंगटे, डॉ. कविता पराडकर, सुपरवायझर भाऊ हडकर, आरोग्य सहाय्यिका अनुजा प्रभूखानोलकर, फार्मासिस्ट चंदन फोंडेकर,अतुल बंगे, उपसरपंच समद  मुजावर, मंजुनाथ फडके, प्रवीण नेरुरकर अमोल शृंगारे , मितेश वालावलकर, प्रसाद प्रभू, रवी गावडे, प्रसाद पोईपकर,नितीन नेरुरकर, संतोष मुणगेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा