30 बेडचे सुसज्ज आदर्शवत असे कोविड केअर सेंटर पाठोपाठ नगरपंचायत ने जिल्ह्यात 100 बेडचे पहिले विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा मिळवला मान
नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
कणकवली
भगवती मंगल कार्यालय येथे तयार करण्यात आलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठीच्या संस्थात्मक कोविड विलगीकरण केंद्राचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्या रविवारी सकाळी 10. वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
या लोकार्पण प्रसंगी जि.प.अध्यक्ष संजना सावंत, माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, व सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. 100 बेडचे सुसज्ज असे हे विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असून, येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना मोफत जेवणासह, वायफाय, मनोरंजनाच्या सुविधेसह अन्यही सोयीसुविधा देण्यात येणार आहेत.
कणकवली नगरपंचायतने यापूर्वी मुडेश्वर मैदान येथील पर्यटन सुविधा केंद्रात 30 बेडचे सुसज्ज आदर्शवत असे कोविड केअर सेंटर सुरू केले असून, त्यापाठोपाठ आता नगरपंचायत ने जिल्ह्यात 100 बेडचे पहिले विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा देखील मान मिळवला आहे. या विलगीकरण केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती नलावडे यांनी दिली.