You are currently viewing कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल…

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल…

आ. नितेश राणे मुळे कळसुली प्राथ. आरोग्य केंद्राला मिळाली ऍम्ब्युलन्स

कळसुली ऍम्ब्युलन्स चा लोकार्पण सोहळा संपन्न…….

गेले कित्येक दिवस मागणी असलेल्या कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ऍम्ब्युलन्स दाखल झाली. सदर ऍम्ब्युलन्स मिळावी या साठी आमदार नितेश राणे व जी.प. अध्यक्ष संजना सावंत यांनी पाठपुरावा केला होता, लोकांची होणारी गैरसोय दूर झाली असून समाधान व्यक्त होत आहे. ऍम्ब्युलन्स लोकार्पण करतांना आमदार नितेश राणे व संजना सावंत यांचे आभार मानले.

यावेळी श्रीफळ सभापती मनोज रावराणे यांनी श्रीफळ वाढवले व पूजन जी.प. सदस्या सायली सावंत यांनी करून लोकार्पण केले. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, पं स सदस्य मिलिंद मेस्त्री, शशी राणे, सरपंच महेश शिलवलर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ पोळ, उप सरपंच सचिन पारधिये, जयवंत घाडीगांवकर, रुजाय फर्नांडिस, समीर प्रभुगावकर, स्वप्नील गोसावी, समीर सावंत, राजू नार्वेकर, विकास कदम, दीपक मेस्त्री, राजा दळवी, रणजित घाडीगावकर, हेमंत वारंग, टाॅनी फर्नांडिस, दत्ताराम घाडीगावकर, सत्यविजय परब, पंकज सावंत, भारती देसाई, दीपक तांबे, डॉ भडांगे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा