You are currently viewing ५ जुन जागतिक पर्यावरण दिवस

५ जुन जागतिक पर्यावरण दिवस

5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन – World Environment Day म्हणून साजरा केला जातो.

1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.

पर्यावरण दिन का साजरा करतात?
जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, “आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे.”

‘झाडांआधी आम्हाला कापा’ असे म्हणत झाडाला मिठी मारायला शिकवणारा अवलिया
‘आई तू कधीच मला सोडून जाणार नाहीस, झाडांच्या रुपात नेहमी सोबत असशील’
पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात.
दरवर्षी पर्यावरण दिनासाठी एक थीम ठरवली जाते आणि एक देश त्यासाठी ‘होस्ट’ अथवा यजमान असतो.

यावर्षीची थीम काय आहे?
2021 वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं.

वर्षानुवर्षं आपण आपल्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत, आणि परिणामी पर्यावरणाचं नुकसान झालंय.
जगभरातमध्ये दर तीन सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढं जंगल नष्ट होतंय. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50 टक्के प्रवाळ (Corals) नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90 टक्के प्रवाळं नष्ट होण्याचा अंदाज आहे.

पर्यावरणाची ही हानी रोखत, पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न, ही यावर्षीची थीम आहे. 2021पासून पुढचं दशक युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्रं) परिसंस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठीचं दशक म्हणून साजरं करणार आहे.

जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या परिसंस्था – इकोसिस्टीम (Ecosystem) चं नुकसान रोखत, ते थांबवून ही हानी भरून काढण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानव जातीलाही होईल, गरीबी कमी होईल, हवामान बदल (Climate Change) कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत, असं युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर म्हटलंय.

प्रतिक्रिया व्यक्त करा