जिल्हा खनिकर्म विभाग कडून सहा रुग्णवाहिका जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिका जिल्हा मुख्यालयात येऊन सहा ते सात दिवस उलटूनही सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुपूर्द करण्यात आल्या नव्हत्या. यातील एक रुग्णवाहिका मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आली होती. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेली रुग्णवाहिका आरोग्य केंद्राकडे सुपूर्त करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी चार जून पर्यंत नवी आलेली रुग्णवाहिका आरोग्य केंद्राकडे सुपूर्त करा अन्यथा पाच जून रोजी मुख्यालयात उभे असलेल्या रुग्णवाहिकेच्या टपावर बसून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या उपोषणाचा इशाऱ्या नंतर जिल्हा प्रशासन कडून आज मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेली ॲम्बुलन्स संध्याकाळी केंद्राला सुपूर्द करण्यात आली.त्यामुळे ग्रामस्थ व आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. नव्याने आलेल्या ॲम्बुलन्स बद्दल मराठे यांना विचारले असता ॲम्बुलन्सची या केंद्राला नितांत गरज होती. ती नव्याने आलेल्या ॲम्बुलन्स मुळे पूर्ण झाली आहे. याबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांचे आभार मानतो असे मराठे यांनी सांगितले.