सिंधुदुर्गनगरी
सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन ५ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात १० हजार वृक्ष लागवडीचे आयोजन केले आहे.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड उपक्रम राबवून पर्यावरण आणि ऑक्सिजन वाढीसाठी गेल्या काही वर्षात कोट्यावधी ची झाडे लागवड केली. यावर्षी ५ ते १५ जून या कालावधीत पर्यावरण दिना निमित्त प्रत्येक तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा दहा ते वीस कि .मी .च्या अंतरावर वृक्षलागवड उपक्रम राबवीण्याचा निर्णय घेतला आहे.
सामाजिक वनीकरण च्या माध्यमातून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हात १० हजार वृक्ष लागवडचे आयोजन केले आहे.
गेल्या दोन-तीन वर्षात राज्य शासनाने वन विभाग आणि सामाजिक वनीकरण कृषी विभाग यांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम राबऊन २ कोटी, ४ कोटी, १३ कोटी, आणि त्यानंतर ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रम गेल्या चार वर्षात हाती घेण्यात आला. त्यात राज्यभरात ५५ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. गेल्या दोन वर्षात कोरोणाच्या महामारी मुळे सिंधुदुर्ग सह राज्यभरात या वृक्ष लागवड कार्यक्रमाला स्थगिती आहे. या वर्षी रोजगार हमी ,सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून रस्ता दुतर्फा १० हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. कोरोणाच्या कालावधीत कमी प्रमाणात मिळणारा मजूर वर्ग आणि वन विभाग सामाजिक वनीकरण विभाग या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे ,शाळा बंद अशा परिस्थितीत हा उपक्रम कशा पद्धतीने राबवावा. हा यक्षप्रश्न संबंधित विभागांच्या समोर आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि प्रत्येक माणसाला ऑक्सिजन ची असलेली नितांत गरज, झाडांच्या माध्यमातूनच अधिक प्रमाणात पूर्ण होऊ शकते. यादृष्टीने सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली परंतु सद्यस्थितीत खाजगी जमिनी ,सामायिक जमिनी यामुळे या वृक्ष लागवड कार्यक्रमाला हवे तसे यश मिळत नाही. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सध्या बांधावरचा बाबू लागवड ,रोजगार हमी फळबाग लागवड ,अशा वैयक्तिक लाभाच्या उपक्रमाला गती देण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण च्या माध्यमातून पर्यावरण संतुलन दिनाचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यात वीस किलोमीटर अंतरावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे सर्व तालुक्यात मिळून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे.