बांदा
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंधलेखन स्पर्धेत बांदा नं.१केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश मिळवून आॅनलाईन स्पर्धातील शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
गेल्या वर्षभरापासून अधिक काळ शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त वाव मिळावा यासाठी विविध संस्था आॉनलाईन स्पर्धात्मक उपक्रम राबवित आहेत. अष्टपैलू कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून विविध गटात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते यामधे बांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले त्यामधे चैतन्या उमेश तळवणेकर इ.६वी हिने आॅनलाईन शिक्षण माझा अनुभव हिंदी माध्यमातून प्रथम क्रमांक , स्नेहा सचिन निंबाळकर इ .७वी आॅनलाईन शिक्षण माझा अनुभव मराठी माध्यम द्वितीय क्रमांक,नील नितिन बांदेकर इ. ३री माझा आवडता नेता द्वितीय क्रमांक,पूर्वा हेमंत मोर्ये इ.४थी माझा आवडता नेता उत्तेजनार्थ क्रमांक,सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर इ. १ली माझी आई उत्तेजनार्थ क्रमांक.
याचबरोबर या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी
दुर्वा दत्ताराम नाटेकर,नैतिक निलेश मोरजकर,चिन्मयी सुरेश रूबजी,शुभंकर सूर्यकांत वराडकर ,नेहा विजय शंभरकर या सर्वांना राज्यस्तरीय प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब, जे. डी .पाटील, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान व पालकांनी अभिनंदन केले आहे. आॅनलाईन स्पर्धात्मक उपक्रमात बांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.