You are currently viewing माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन

नवी दिल्ली :

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांनी दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमध्ये आज १३ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.
राजकीय क्षेत्रासह सामाजिक व इतिहासिक विषयांचे ही डॉ. रघुवंश प्रसाद सिंह जाणकार होते. डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांना जून मध्ये करोनाची लागण झाली होती. परंतु त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र सप्टेंबर च्या सुरुवातीला त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. शुक्रवारी मध्यरात्री अचानक त्यांची तब्येत जास्त बिघडून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमधूनच २-३ दिवसापूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव व पटनाचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राजीनामा देणारे पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी आरजेडी सोडण्याचा निर्णय मांडला होता.

“जननायक कर्पूरी ठाकुर यांच्यानंतर तुमच्या पाठीशी मी कायम उभा राहिलो. मात्र आता नाही. पक्षाचे कार्यकर्ते आणि तुम्हा सगळ्यांच्या स्नेह लाभला. पण आता मला माफ करा असे, सिंह यांनी लालूप्रसाद यादव यांना पत्रात उद्देशून लिहिले होते. त्यावेळी मात्र रघुवंश प्रसाद सिंह यांचे पत्र लालूप्रसाद यादव यांनी नाकारून तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, असे म्हटले होते.

आज डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनाची वार्ता कळताच लालूप्रसाद यादव यांनी ट्विट केले .

 

खऱ्या आयुष्यातही डॉ. रघुवंश प्रसाद सिंह साध्या पद्धतीने राहणारे व्यक्तिमत्व होते. डॉ. रघुवंश प्रसाद सिंह हे UPA-1 मध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री होते. महाराष्ट्रातील रोजगार हमी कायद्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या मनेरगा कायद्याची अंमलबजावणी डॉ.रघुवंश प्रसाद सिंह यांनी केली.
आज दुखदप्रसंगी पटनाचे मुख्यमंत्री श्री नितीष कुमार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सर्वांनी सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या प्रिय आत्पेष्ठांना दुखदसमयी धैर्य धारण करण्याची शक्ती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा