You are currently viewing “करून दाखवलेच्या” फुशारक्या नंतर मारा आधी प्रथम जि. प. च्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना कोव्हिड लस द्या – शिवसेना जि प गटनेते नागेंद्र परब

“करून दाखवलेच्या” फुशारक्या नंतर मारा आधी प्रथम जि. प. च्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना कोव्हिड लस द्या – शिवसेना जि प गटनेते नागेंद्र परब

सिंधुदूर्ग :

सर्वात प्रथम जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कोव्हिड लस द्या. त्यांच्या नाका तोंडात दर आठवड्याला सुया टोचून त्यांची दर आठवड्याला रॅपिड टेस्ट का करता? असा सवाल शिवसेनेचे नागेंद्र परब यांनी “करून दाखवले” म्हणणाऱ्यांना केला आहे.

नागेंद्र परब म्हणाले “जे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना जमले नाही ते राणेंच्या जिल्हा परिषदेने करुन दाखवले, अशी जी वल्गना राणेंच्या प्रहार ने केली आहे. मुळात त्यांनी ही जिल्हापरिषद राणेंची आहे की भाजपाची आहे हे जाहीर करावे.” कारण सन्माननीय जि. प. उपाध्यक्ष म्हापसेकर ही जिल्हा परिषद भाजपची आहे असे सांगतात व प्रहारवाले ती राणेंची असल्याचे लिहितात.

मुळात मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने कोविड संदर्भातील सर्व उपाय योजनांचे व लसीकरणाचे अधिकार स्थानिक प्रशासनाला यापूर्वीच दिलेले आहेत. त्यामुळेच जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी यांनी राज्याच्या आरोग्य खात्याच्या संचालक श्रीमती अर्चना पाटील मॅडम यांच्याशी संपर्क करून पत्रकारांना लस देण्याची परवानगी घेतली त्याचे आम्ही स्वागत करतो. खर तर पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करून सोयी सुविधा द्याव्यात यासाठी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी कायमच काळजी घेतली आहे. त्यांना आमच्या पालकमंत्री ना. उदय सामंत, मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या बद्दल मनात कलुषितपणा आणुन देण्या इतपत पत्रकार मित्र खुळे नाहीत.

राज्य सरकारने पर्यायाने मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाने राज्य सरकारबरोबर पाठपुरावा करून जिल्ह्यातील पत्रकार मित्राना लस उपलब्ध करून दिली. याचे श्रेय स्थानिक प्रशासनाबरोबरच पर्यायाने राज्य सरकारला जाते. कोरोना महामारीच्या या संकटात टीका टीपणी करण्यापेक्षा समाजात सध्या ख-या अर्थाने निस्वार्थी वृत्तीने काम केले पाहिजे. ज्या पध्दतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे काम करतात त्यांचा आदर्श घेऊन खासदार विनायक राऊत साहेब, पालकमंत्री उदय सामंत साहेब, आमदार वैभव नाईक, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर ज्या पध्दतीने काम करतात. त्या पध्दतीने काम करा असा सबुरीचा सल्ला देत परब म्हणाले.

पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मधून रुग्ण वाहीका दिल्या. त्यावेळी प्रोटोकॉल म्हणून जि प अध्यक्षा सौ संजना सावंत यांना आदराने सन्मान दिला होता. त्यातही सौ सावंत यांनी राजकारण सुरू करून जणु आपणच रुग्णवाहिका दिल्या असे फोटोसेशन केले. हीच तुमची कटु निती असल्याचे निक्षून सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य आणि कोव्हिड साठी झपाटुन काम करणारी शिवसेना जिल्ह्य़ातील गावा गावात झोकून देत प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करीत आहे. त्यामुळे “इवलेसे केले आणि भले मोठे मोठे करुन दाखवले, ही निती बंद करा” असा सल्लाही नागेंद्र परब यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा