– श्री बाबा मोंडकर.जिल्हा प्रवक्ते भाजपा. सिंधुदुर्ग.
तौक्ते वादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, व्यापारी, मच्छीमार, पर्यटन व्यवसायीक उध्वस्त झाला आहे. आघाडी सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती तुटपुंजी आहे मंजूर झालेली शासकीय मदत बघता मिळणारी मदत ही नुकसानग्रस्तांची चेष्टा करणारी आहे. सत्तेतील आमदार श्री वैभव नाईक वादळ झाल्यानंतर मालवण कुडाळ मध्ये गरागरा फिरले वाटले की जनतेला भरीव मदत मिळेल पण दोनच दिवसानी समजले की ही सगळी धडपड भगव्या रंगाच्या ताडपत्री विकून दलाली कमावण्यासाठी होती कित्येक कामे स्थानिकांनि केली ती आपण केली म्हणून सांगण्याची धडपड चालू होती त्यात सिंधुदुर्ग किल्यांवरील महाराजांच्या मंदिरावर पडलेला वड हा स्थानिक रहिवासी व एका धर्मदाय संस्थेने स्वखर्चाने काढून घेतला त्याचे हि श्रेय हे आमदार महाशय आपल्या नावाने घेतले.वास्तविक या जिल्ह्यांने शिवसेनेला खासदार व दोन आमदार दिले यांनी मंत्रालय स्तरावर यां पक्षाचा मुख्यमंत्री समोर आपले राजकीय वजन वापरून जनतेच्या नुकसानीची १००% भरपाई मिळणे साठी प्रयत्न करणे गरजेचे होते.सुपारी, माडाच्या झाडाला अनुक्रमे ५०रुपये व२५० रुपये मंजूर करण्यात आले आहेत यापेक्षा कित्येक पटीने खर्च पैसे हि झाडे तोडण्यासाठी आला आहे. मोडलेल्या, नुकसान झालेल्या घर, मांगर, झोपडी च्या झालेल्या नुकसानीच्या जेमतेम ५% पेक्षा कमी मदत शासनाकडून मंजूर झाली आहे. पर्यटन व्यावसाईकांच्या हॉटेल, घर मध्ये पाणी घुसून टीव्ही फ्रीज हॉटेल सामानाचे,कंपाउंड़ वाँल त्याच्या शप्पराचे तसेच जलक्रिडाच्या होड्याच्या झालेल्या नुकसानीच्या १ रुपया पण मंजूर झाला नाही आहे. तौक्ते वादळाचे रूद्रावतार बघता मालवण तालुक्यात देवबाग व तळाशील येथे मा.नारायणजी राणे यांच्या दूरदृष्टी च्या माध्यमातून समुद्रकिनारी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे या भागातील मच्छीमारवस्ती वाचू शकली मच्छीमारानांही मंजूर नुकसानीची भरपाई अत्यल्प आहे. यां सर्व वास्तवतेकडे सत्तेतील दोन्ही आमदार व यां जिल्ह्याच्या पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी लक्ष देऊन नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसानीच्या १००%टक्के मदत करण्यात यावी अशी मागणी श्री बाबा मोंडकर. जिल्हा प्रवक्ते भाजपा. सिंधुदुर्ग यांनी केली आहे.