You are currently viewing मनसेने केला वीजवितरण अधिकारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सन्मान

मनसेने केला वीजवितरण अधिकारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सन्मान

वीजपुरवठा अतिशय कमी वेळात पुर्ववत स्थितीत आणल्याबद्दल व्यक्त केली ‘कृतज्ञता’

मालवण

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वीजसेवा सुरू करण्यासाठी मालवण तालुक्यातील वीजवितरणच्या अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी अहोरात्र मेहनत घेतली. प्रचंड प्रमाणात नुकसान होवूनही १० ते १२ दिवसात बर्‍याच ठिकाणाचा विद्युत पुरवठा पुर्ववत केला. त्याबद्दल तालुका मनसेच्यावतीने वीजवितरणच्या अधिकार्‍यांना, कर्मचाऱ्यांना मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी विल्सन गिरकर, शैलेश अंधारी, नितिन खानोलकर, किसन गावकर, राजेश पालव आदी उपस्थित होते.

मालवण शहराला १६ मे रोजी तौक्ते वादळाचा जोरदार तडाखा बसला होता.संपूर्ण मालवण शहरात मोठे वीजवितरणचे नुकसान झाले होते.अंदाजापेक्षा जास्त तिव्रतेने हे वादळ मालवण शहरात धडकले.या वादळाचा जास्त फटका वीजवितरण कंपनीला बसला.वीज खांब कोसळले,तारा तुटून गेल्या.दुरुस्तीसाठी अन्य जिल्ह्यातून वीज अधिकारी कर्मचारीही मदतीसाठी मालवण शहरात दाखल झाले होते.

अधिकारी,स्थानिक कंत्राटी कर्मचारी,दाखल झालेले कर्मचारी व नागरिक यांच्या प्रयत्नातून विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाला.काही कर्मचारी कर्तव्य बजावत आसताना कोविड पाॕजिटीव्ह झाले.

म्हणुनच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वीजसेवा सुरू करण्यासाठी मालवण तालुक्यातील वीजवितरणच्या अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणेसाठी मनसेतर्फे सन्मानित केले असल्याचे मनसेकडुन स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा