वेंगुर्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सात वर्षाचा यशस्वी कार्यकाल पुर्ण झाला .भाजपा च्या वतीने देशभर सेवा कार्य हाती घेऊन हा दिवस साजरा केला. भाजपा – सिंधुदुर्ग च्या वतीने ह्या निमित्ताने सेवा – सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते कोवीड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
वेंगुर्ले नगरपरिषदेचे कर्मचारी हेमंत किसन चव्हाण, अनिल शशिकांत वेंगुर्लेकर, अक्षय विजय तेरेखोलकर, पंकज विजय पाटणकर हे कोवीड काळात मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे जोखमीचं काम करत आहेत.
त्यांनी वेंगुर्ले शहरातील तसेच तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांचेही दहन केले. अशा प्रकारे कुणालाही न जमणारे काम जिवावर उदार होऊन एक सेवा म्हणून बजावत आहेत, आणि हेच खरोखरचे कोवीड योद्धे आहेत, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले. तसेच हे समाजोपयोगी कार्य करत असताना आपली व आपल्या कुटुंबांचीही काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
तसेच भाजपा वेंगुर्लेच्या पदाधिकारयांनी सेवा – सप्ताहाच्या काळात आगळे वेगळे उपक्रम आयोजित करुन जनसामान्यांत एक समाजसेवेचा आदर्श घालून दिला याबद्दल गौरोवऊदगार काढले. वेंगुर्ले तालुका कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, नगरसेवक धर्मराज कांबळी व प्रशांत आपटे, नगरसेविका श्रेया मयेकर, महिला मोर्चा सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .