सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दिली.
नानाभाऊ पटोले यांचा जन्म एका गरिब शेतकरी कुटुंबात झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना स्वकर्तृत्व व लोकांच्या पाठिंब्यावर ते राजकारणात मोठ्या पदापर्यंत पोहचले. आमदार, खासदार, विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सतत शेतकरी, कष्टकऱ्यांच्या कल्याणावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्याच्या न्यायिक हक्कासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला. शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आपल्याच सरकारशी दोन हात करण्यात त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. नरेंद्र मोदी यांच्या जुलमी राजवटीत शेतकऱ्यांचा अतोनात होत असलेला छळ त्यांना पहावल्या गेला नाही. “अच्छे दिन” चे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांना मोदी सरकार कडून फसवल्या गेलं आहे, शेतकऱ्यांना त्यांच्याकडून न्याय मिळेल याची काहीही शास्वती राहिलेली नाही हे नानाभाऊंच्या लक्षात येताच त्यांनी आपली राजकीय कारकिर्द डावावर लावून भाजपच्या खासदारकीचा राजीनामा फेकून दिला. ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या पुढे कोणाचीही बोलण्याची हिम्मत होत नव्हती त्यावेळी शेतकरी व ओबीसींच्या मुद्यावरून मोदींसोबत पंगा घेतला. प्रसंगी त्यांच्या हिटलरशाही भूमिकेचा निषेध करत नानाभाऊंनी सत्तेतल्या खासदारकीला
ठोकर मारली. विधानसभेचे अध्यक्षपद भूषवितानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रामुख्याने प्राधान्य दिले. ‘मोहाफुल’ प्रश्नीही आदिवासींना न्याय मिळवून दिला. शेती व शेतकऱ्यांप्रती तळमळीने काम करणाऱ्या नानाभाऊंचा ५ जून रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात ‘शेतकरी सन्मान दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
या दिवशी सिंधुदुर्गातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवून आपल्या शेतकरी
नेत्याला खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्गात खालील उपक्रम राबविण्यात यावेत याकडेही जिल्हा काँग्रेसचे त्यांनी लक्ष वेधले आहे.
*कोरोनाच्या महामारीत अनेक शेतकरी बांधवांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली आहे, अशा शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे किंवा खतांचे वाटप करावे.
★ गरिब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन त्यांना आधार द्यावा.
★ गरिब गरजू आणि कष्टकरी लोकांना गहू, तांदूळ, डाळी किंवा अन्नधान्य वाटप करावे.
★ कोरोना कोविड सेंटरला ऑक्सीजन कान्सटेटरचे वाटप करावे.
★ आपापल्या गावातील लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करुन त्यांचे लसीकरण करावे.
★ कोरोनाचे संकट निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करावी.
★ कोरोनाच्या महामारीत अनेक शेतकरी बांधवांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली आहे, अशा शेतकरी कुटुंबाला खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे किंवा खतांचे वाटप करावे.
★ गरिब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन त्यांना आधार द्यावा.
★ गरिब गरजू आणि कष्टकरी लोकांना गहू, तांदूळ, डाळी किंवा अन्नधान्य वाटप करावे.
★ कोरोना कोविड सेंटरला ऑक्सीजन कान्सटेटरचे वाटप करावे.
★ आपापल्या गावातील लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करुन त्यांचे लसीकरण करावे.
★ कोरोनाचे संकट निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करावी.