चाळीस लाखांच्या दारूसह 55 लाखांचा मुद्देमाल ताब्यात
तळेरे येथील कारवाईत दोघांना अटक
कणकवली
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने महामार्गावर गोवा बनावटीच्या तब्बल 40 लाख रुपये किमतीच्या दारूसह टेम्पो मिळून 55 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गोव्याहून नाशिक कडे जाणारां टेम्पो या पथकाने तळेरे येथे पहाटे 3:15 च्या सुमारास ताब्यात घेतला याप्रकरणी चालकासह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तळेरे येथे नाशिक कडे जाणारा आयशर टेम्पो (GJ24 X 0911) च्या हौद्यात गोवा बनावटीच्या दारूचे 357 बॉक्स सापडले. याची किंमत चाळीस लाख 25 हजार 880 रुपये असून एकूण 55 लाख 25 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, उपनिरीक्षक सचिन शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार प्रकाश कदम, गुरुनाथ कोयंडे, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, रवी इंगळे, संकेत खाड्ये, प्रथमेश गावडे, चंद्रकांत पालकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.