महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन महाराष्ट्र आयोजित स्पर्धा-
तळेरे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,महाराष्ट्र राज्य वतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
सिंधुदुर्ग निबंध स्पर्धेत पुळासयेथीव व माणगाव ज्यू. काॅलेजचा इ.११वी तील कु.गौरेश गुंडू लांबर याचा प्रथम क्रमांक तर कासार्डे माध्यमिक विद्यालयाची इ.१०वी मधील कु.सानिका दत्तात्रय मारकड हिने द्वितीय क्रमांक मिळवून या दोन्ही निबंधांची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री.जे.पी.बघेल,मधु शिंदे,श्री.पाचपोल,दत्ताजी डांगे, व बिरू कोळेकर आदी राज्य कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी तसेच अहिल्यादेवी प्रबोधन मंच सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र झोरे व सरचिटणी रघुजी बोडेकर व संपूर्ण जिल्हा कार्यकारणी सदस्यांनी अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
येत्या ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्याच्यावतीने या यशस्वी विद्यार्थ्यांना आयोजकांच्यावतीने अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
१)गौरेश लांबर
२)सानिका मारकड