बांधकाम सभापती मंदार केणी यांना आता कोण विचारत नाही आणि शिवसेने मध्ये कोणत्याही प्रकारची किम्मत उरलेली नाही. सामंत साहेबांनवर टीका करायच्या अगोदर आमदार वैभव नाईक यांचा सल्ला घ्यावा उगाचच प्रकाशझोतात येण्यासाठी केणी याची धडपड सुरू आहे. अशी जोरदार टीका भाजपा युवा मोर्चा विभाग अध्यक्ष चेतन मुसळे यांनी मंदार केणी यांवर केली आहे.
सामंत साहेब नगरसेवक नाही का आमदार खासदार नाही अस असताना देखील त्यांच कोरोना काळातील आणि चक्री वादळातील समाजकार्य उल्लेखनीय आहे. मंदार केणी यांनी दत्ता सामंत यांच्यावर भाष्य करणे म्हणजे स्वतःच आणि आपल्या नेत्यांच अपयश जनतेसमोर मांडण्यासारख आहे. केणी यांनी आपली लायकी सांभाळावी आणि चागंल समाजयोग्य कार्य करून दाखवाव नंतरच टीका करावी. यापुढे अशाप्रकारची टीका सहन केली जाणार नाही, असे ही चेतन मुसळे यांनी म्हटले आहे.