जागा झाल्या महाग,
बंगले राहीले स्वप्नात.
सर्वसामान्य लोकांना,
फ्लॅटच उरले शहरात.
आपापल्या घरात,
माणूस बंदिवान झाले.
दारे खिडक्या बंद जणू,
एकांतवासात जगले.
कोण राहतं शेजारी,
नसे कल्पना कुणा.
नातं नसतं आपुलकीचं,
फक्त बाजूवाला म्हणा.
नजरानजर झालीच कधी,
अवघडल्यासारखे हसतात.
बोलायचं म्हटलं तरी,
धीरगंभीर होऊन बोलतात.
काही सोसायटी असतात,
एक कुटुंब बनून राहतात.
सण समारंभ जणू सर्व,
एकोप्याने साजरे करतात.
एकमेकांच्या मदतीस सारे,
एक होऊन धावतात.
संकटकाळात असे शेजारी,
एकमेका देवासारखे पावतात.
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६